ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून चव्हाणवाडी गावाची जलतारा प्रकल्पांतर्गत निवड.


                    जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निवडीने गावाची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार.

दैनिक कर्णधार: प्रतिनिधी: शंकर माने पाटण 25 मे 

चाफळ विभागातील चव्हाणवाडी (नाणेगाव) हे गाव डोंगर पठारावर वसलेले गाव असून या गावामध्ये प्रतिवर्षी उन्हाळयात पाण्याची तीव्र टंचाई भासते.उन्हाळयात गावाला पिण्याच्या पाण्यासाठी शासनामार्फत टँकरची सुविधा पुरविण्यात येते.पाणी टंचाई लक्षात घेऊन कायमस्वरुपी टंचाई दूर करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी चव्हाणवाडी या गावाची राज्य शासनाचे नव्याने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्प या योजनेमध्ये निवड केली असल्याने गावाला उन्हाळयात प्रतिवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल असा विश्वास संजय गांधी निराधार योजना समितीचे मा.अध्यक्ष भरत साळूंखे यांनी व्यक्त केला.

                 पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी चव्हाणवाडी गावाची जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्प योजनेमध्ये निवड केल्यानंतर प्रत्यक्ष गावामध्ये राबवावयाच्या‍ विविध योजनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षित दाखविण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जलतारा प्रकल्पाचे राज्य समन्वयक प्रा.पुरुषोत्तम वायाळ,जलसंधारण विभागाचे अधिकारी  टकले मा.पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव, स्वीय सहाय्यक रविंद्र साळूंखे यांनी प्रत्यक्ष गावात येऊन भेट दिली व या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेची सर्व माहिती ग्रामस्थांना दिली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील,मनोहर कडव,सत्यवान चव्हाण,रमेश चव्हाण,विजयराव जंबुरे,प्रकाशराव जाधव यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

                   यावेळी बोलतान ते पुढे म्हणाले की,चव्हाणवाडी गावाला प्रतिवर्षी उन्हाळयामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असते.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला उन्हाळयात टँकरने पाणी पुरवठा होण्यासाठी पंचायत समितीकडे सातत्याने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा लागतो. उन्हाळयात गावातील ग्रामस्थांसह महिला वर्गाची पाण्याची मोठी गैरसोय होते.येथील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे.लवकरच या कामालाही सुरुवात होणार आहे.परंतु या गावाची भूजल पातळी वाढविण्याची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी चव्हाणवाडी या गावाची जलयुकत्‍ शिवार योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्प या योजनेमध्ये  प्राधान्याने निवड केली असल्याने या योजनेअंतर्गत या गावाची भविष्यात भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन गावाची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच या गावाचा भविष्यात पाण्याचा कायमचा प्रश्न मागी्र लागणार असल्याने त्यांनी समस्त चव्हाणवाडी ग्रामस्थ व चाफळ विभागाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले.

                                चव्हाणवाडी गावाची निवड आणि अधिकारी प्रत्यक्ष गावात.

चाफळ विभागातील चव्हाणवाडी हे गाव डोंगर पठारावर आहे.येथील ग्रामस्थांना उन्हाळयात नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.परंतु आज पर्यंत यावरती ठोस असा उपाय करण्यात आला नव्हता.परंतु पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या गावाची जलयुकत्‍ शिवार योजने अंतर्गत प्राधान्याने निवड केली.फक्त निवडच नाही केली तर प्रत्यक्ष या गावात आज अचानक सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी हे जेसीबी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.खर तर या सर्वांशी येथील ग्रामस्थ अनभिज्ञ होते.त्यांना या गोष्टीची कसलीही कल्पना नव्हती.परंतु ना.शंभूराज देसाई यांनी पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेमध्ये गावाची निवड करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने येथील ग्रामस्थही भारावून गेले आणि पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले.