दिंडोरी रोडवरील अपघातात आठ वर्षीय मुलीचा मृत्यू


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

        २ मे नाशिक:दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीत रस्त्यालगत सोमवार (ता.०१) रोजी सायंकाळी सहा वाजता झाला इंट्रा (चारचाकी) चाकाखाली येऊन आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर मुलीच्या डोक्याहून गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

       जोया सलीम शेख (वय ८ ) अपघातात मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. शेख दांपत्यास हे एकुलती एक अपत्य असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या घटनेने उपस्थित संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करीत ड्रायव्हरला मारहाण केली असल्याचे वृत्त समोर येत आहे.अपघातानंतर घटनास्थळी ॲम्बुलन्स दाखल झाली. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी ॲम्बुलन्स मधून नेत असताना, जोयाचे वडील सलीम शेख यांनी ॲम्बुलन्सचा रस्ता अडविला. सदर अपघातामुळे अवधूत वाडी रस्ता अचानक जाम झाला होता.घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पथकासह रवाना झाले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अति शीघ्र दल पथकास पाचारण करण्यात आले होते.यामुळेच गर्दीची परिस्थिती नियंत्रणात आली. पंचवटी पोलिस ठाण्यात मयत जोयाचे नातेवाईक यांनी फिर्याद दाखल करीत आहेत. सदर इंट्रा चारचाकी वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.