वेरुळ येथील डमडम तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू


 खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील शिवकालीन डमडम तलावामध्ये एक तरुण बुडत असताना एक दूसरा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात गेला असता तोही बुडाला यात दोघांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.


संकेत गुलाबसिंग बह्मणावत (17 वर्ष) आणि आयुष त्रियंबक नागलोद (7 वर्ष) दोन्ही राहणार तलाववाडी वेरुळ असे पाण्यात बुडुन मृत्यु झालेल्या मुलांची नावे आहेत.
    या बाबत अधिक माहिती अशी की, शिवकालीन डमडम तलाव परिसरात संकेत बह्मणावत (17 वर्ष) आणि आयुष नागलोद (7 वर्ष) दोन्ही दुपारी शेळ्या चारण्यासाठी गेले होते.नंतर संकेत पोहण्यासाठी डमडम तलावात उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज ना आल्याने तो बुडाला दरम्यान त्याला वाचवण्यासाठी संकेतने पाण्यात उडी मारली मात्र त्याला पोहता येत नस्लयाने तो ही पाण्यात बुडाला व या घटनेत दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत झाला. दरम्यान परिसरातील लोकांना दोन्ही मुले गायब असल्याचे समजले. नंतर त्यांनी शोध घेतला असता ते पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले.
        तदनंतर वेरूळ येथील ग्रामस्थांनी डमडम तलाव परिसरात येवून बुडालेल्या दोघा मुलांचा शोध घेतला. परंतु, ते आढळून आले नाही नंतर वेरुळ गावाचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी खुलताबाद पोलीसांना यबाबत ची माहिती दिली. माहिती मिळताच खुलताबाद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे, बीट जमादार राकेश आव्हाड, संजय ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत वेरूळ येथील तंटामुक्ति अध्यक्ष सुरेश नाना ठाकरे, कैलास मोरे, संजय सोनवणे, सोनाजी ठाकरे हे तलावात उतरले व संकेत व आयुष यांचा मृतदेह तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढला. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.व नंतर मृतदेहाना वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले व येथील वैद्यकिय अधिकारी डॉ एम एम चोपडे यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
    सदरील घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने वेरुळ व परीसरातील नागरिकांनी बघण्यासाठी डमडम तलाव परिसरात एकच गर्दी केली होती.