पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी



उदगीर (प्रतिनिधी)

उदगीर येथील पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचे इ.5 वी व इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 69 विद्यार्थी पात्र झाले आहेत. शै.वर्ष 22-23 या वर्षातील इ‌.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचे इ.5 वी चे 28 तर इ.8 वी चे 41 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

इ.5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे I-कु.शाश्वत उत्तम बेंजलवार(212), II-कु.प्रधुमन विठ्ठल चामवाड(208), III-कु.संस्कार संजयकुमार तोंडारे (206), IV-कु.अथर्व शिवाजीराव मोरे(194), V-कु. गौरवी वैजनाथ बिराजदार(194), VI-कु. चैतन्य चंद्रकांत कांदे(190), VII-कु. ओम सतीश हुडे(186) तसेच इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे I-कु.महेंद्र संजय कुमार बिरादार(298 पैकी 252), II-कु.श्लोक राजीव निजवंते(214), III-कु.अथर्व प्रशांत पेठे (204), IV-कु.आदित्य दिलीप केंद्रे(194), V- कु.वेदांत देवेंद्र पाटील(190), VI-कु.सर्वज्ञ सतनाप्पा हुरदळे(184), VII-कु.असरार सादिक पटेल(180). क्रमांक पटकावला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.....! यशस्वी विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा प्रभारी मीनाक्षी बिरादार आणि स्विना खैरा यांच्या देखरेखी खाली सौ.मंजुषा पाटील, सौ.सुमन मोघे, सौ.हुमेरा दुर्राणी, सौ.अश्विनी सरकाळे, वसंत नेमाने, सौ.ईशरत शेख या शिक्षकांचे मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांना लाभले. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री.सूरज पोस्ते सर, प्राचार्य श्री.दिगंबर शेखापुरे, उपप्राचार्य डॉ.मुबारक मुल्ला यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.