प्रशासन व अधिकारी लक्ष देणार का...?? आणखी किती बळी घेणार.... नागरिकांचा सवाल..???
तालुका प्रतिनिधी सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील तेरखेडा येथे फटाक्यांच्या गोदामाममध्ये बुधवारी झालेल्या स्फोटानंतर तेरखड्यातील फटाका कारखाने व कामगार यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नियम धाब्यावर बसवून निर्मिती करणारे कारखाने आणि अवैधपणे होणारा फटाक्यांचा साठा यांकडे प्रशासनाकडून वेळीच लक्ष दिले जाणार का, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येत आहे.
तेरखेडा येथे मोठ्या प्रमाणात फटाका कारखाने सुरू आहेत. यावर पोलीस व महसूल विभागाचे नियंत्रण स्पष्ट होत आहे. या भागातील अनाधिकृत फटाका कारखान्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तेरखेडा येथे भरवस्तीत व अनेक घरात फटाके निर्मिती होत असल्याने अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
तेरखेडा येथील भरवस्तीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये फटाका निर्मिती होत असून तयार केलेले फटाकेही पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. भरवस्तीत फटाका कारखाना सुरू असल्याने कोणत्या नियमाने येथे परवानग्या देण्यात आल्या, अशी विचारणा होत आहे.
तेरखेडा या भागात अनेक ठिकाणी असे उद्योग सुरु असुन त्यावर महसूल व पोलिस विभागाचे नियंत्रण नसून या भागातील कारखाने यांचा सर्व्हे करुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या अवैध फटाका उद्योगाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
किती बळी घेणार ..?
पाहणी केल्यानंतर कारखान्यात बसवण्यात आलेली सुरक्षा यंत्रणा अडगळीत पडली असल्याचे निदर्शनास आले. वाळूच्या बकेट रिकाम्याच आढळून आल्या, फायर इस्टिंगुशन सिलिंडर वाढलेल्या गवतात बुजून गेलेले निदर्शनास आले.यामुळे आणखीन किती नागरिकांचा व निष्पाप कर्मचाऱ्यांच्या बळी जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..