प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी,
दिनांक १५ ,०५ २०२३ रोजी चांदवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हट्टीच्या मागच्या बाजूला गटर अंडरग्राउंड करावे व हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने या गटाराच्या बाजूला खूप घरे आहेत या गटरीचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे मागील २० ते २५ वर्षापासून हे गटार साफ करण्यात आलेले नाही या गटारीपासून धोका निर्माण होणार असल्यामुळे लोकवस्तीवर याचा परिणाम होईल या लोक परिसरामधील लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये असल्यामुळे या गटारी संबंधाविषयी विविध मागण्या घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगरपरिषद मध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे .
मुख्यअधिकारी चांदवड नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले आहे या आंदोलन करण्यासाठी संजय बनकर, सुरेश निर्भवणे, इंदुबाई गोंधळे,रोहिणी बाई जाधव , सुनिता गोंधळे, संगीता गोंधळे, अलका कापसे, धुरपता साळवे, द्रोपती बाई साळवे, संजय गोंधळे, राकेश जाधव, मनीषा गांगुर्डे, चंद्रकला माळी, शोभाबाई गोंधळे, तारा पवार संजय निर्भवणे, वसीम खान, सतीश अहिरे, बापू केदारे, संतोष केदारे, रंजना साळवे, किशोर आहिरे, संभाजी कोतवाल, रमेश जाधव, ताराचंद अहिरे या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात महिला मंडळ उपस्थित होते