स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आवडे उंचेगाव ची जिल्हा स्तरीय समिती कडुन तपासणी


पैठण:- ग्रामपंचायत आवडे उंचेगाव ता.पैठण येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी पथकाने भेट दिली. व ग्रामपंचायतीने विविध विकास कामाची व अभिनय उपक्रमाची पाहणी व तपासणी केली यावेळी गावातील घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, रेनवाटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण, बोलकी अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व वाचनालय, वैयक्तिक शौचालय, भूमिगत नाली बांधकाम, घनदाट वृक्षलागवड, रोपवाटिका इ.कामाची पाहणी केली. पथक प्रमुख मा.श्री राजेंद्र देसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी केलेल्या कामाची स्तुती केली व समाधान व्यक्त केले. 

   यावेळी  सार्वजनिक शौचालय चे उद्घाटन समिती अध्यक्ष राजेंद्र देसले यांच्या सुचनेनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले,  तर समिती अध्यक्ष राजेंद्र देसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग योजने १०% (महिला व बालकल्याण) अंतर्गत अंगणवाडी सेविका यांना मोबाईल चे वाटप करण्यात आले .

समिती अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले की "सदर कामे हि सर्व लोकाभिमुख कामे केवळ गावकऱ्यांच्या सहकार्याने व एकीच्या बळामुळेच होतात" 

  यावेळी सतीष आंधळे यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री संदीपानजी भुमरे कॅबिनेट मंत्री रोहयो व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानले की, त्यांच्यामूळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती व निधी मिळाला व विलास बापू भुमरे यांचे ही या कामी मोठे सहकार्य मिळाले.

       संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय पथकामध्ये  सत्यजित देशमुख, वैशाली जगताप मॅडम, डॉक्टर संजय वाघ , स्वच्छ भारत मिशन गट समन्वयक संतोष जाधव, समूह समन्वयक अनिता तायडे हे होते.

यावेळी पंचायत समिती पैठणचे विस्तार अधिकारी दशरथ खराद यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तपासणी समिती उद्देश व कार्य बाबत प्रस्ताविक केले 

    या प्रसंगी सरपंच सौ.ज्योती सतीश आंधळे, उपसरपंच भारती सिताराम काकडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर निकाळजे, मोहन पाचे, जिजाभाऊ काळे, दिपक लांडगे, रामेश्वर लांडे, महेश भुसारे, रोहिदास आवारे, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री भारत लांडगे, रामेश्वर तोतरे, रोहित भुसारे,अशोक बलैय्या,अभिष लांडे, सोमनाथ काकडे, ज्ञानेश्वर पवार, सचिन लांडगे, ईश्वर लांडगे , अच्युत जाधव, हरिभाऊ निकाळजे

  ग्रामसेवक शिवराज गायके,  आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक चालक, विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.