प्रतिनीधी | बागलाण
सटाणा दि.12 :- द्याने ता.बागलाण येथील ग्रामस्थांनी नामपूर - ताहाराबाद रस्त्यावरील खामलोन फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले शासनाने नुकतेच काढलेले वाळू लिलाव संदर्भातील परिपत्रक ग्रामस्थांनी मान्य केलेले नसून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले जर प्रत्येक गावातून वाळू गेली तर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासेल म्हणून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लामच लाम रांगा लागल्या होत्या प्रशासनाने वाळू लिलावाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक पगार ,शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस,प्रवीण सावंत,मधुकर कापडणीस, हितेंद्र कापडणीस तसेच आंदोलक ग्रामस्थांनी केली आहे.