येवला बस आगाराचे एक पाऊल स्वच्छतेकडे:-आगार प्रमुख प्रवीण हिरे यांचा उपक्रम

 


प्रतिनिधी पंकज गायकवाड

    आपले बस स्थानक स्वच्छ व सुंदर असले पाहिजे हा ध्यास मनात घेऊन येवला बस आगाराचे प्रमुख प्रवीण हिरे यांच्या संकल्पनेतून माझे बस स्थानक स्वच्छ बस स्थानक - सुंदर बस स्थानक, या उपक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. आपली स्वच्छता, आपले आरोग्य महत्वाचे, त्याचप्रमाणे इतरांचीही आरोग्याची काळजी महत्वाची, असल्याने समाजाचेही आपण काही देणे असतो, म्हणुन आनंद हार्डवेअरचे संचालक, लासलगाव मार्केट कमिटीचे संचालक मा. श्री. तानाजी आंधळे यांनी बसस्थानकातील स्वच्छतेसाठी कचरा कुंडी भेट म्हणुन दिल्या. 

    याप्रसंगी  येवला आगाराचे आगार व्यवस्थापक मा. श्री हिरे साहेब यांनी श्री. तानाजी आंधळे यांचा गुलाब पुष्प, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी मा. आगार व्यवस्थापक साहेब यांनी प्रवाशी बांधवांना स्वच्छतेचे महत्व पटऊन देऊन, येवला बसस्थानक स्वच्छता ठेवण्यास कचरा कुंडीचा वापर करण्याचे आवाहन केले, तसेच आनंद हार्डवेअर यांच्या वतीने, मा.आगार व्यवस्थापपक श्री. हिरे साहेब, सहाय्यक वाहतुक निरिक्षक श्री.विकास वाहुळ साहेब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ लिपिक श्री. अमोल भाऊ भरणे, सागर भाऊ आचारी, वाहतुक नियंत्रक श्री. सुकदेव घोलप, लहानु अलगट डी.व्ही. जाधव,एस डी विंचु,पी एस जाधव, श्री.मधुकर ढाकणे, मनोज हरकल, बाबासाहेब मुळे, योगेश जमधडे, आदि कर्मचारी, प्रवाशी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते..