कथाकार ह. भ. प. साध्वी सोनाली ताई करपे जिल्हा बिड.
दिपक देशमुख मेहकर.
मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वर पारायण सोहळा साजरा. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे म्हणून या भुमीला खऱ्या अर्थाने संत पंरपरेच अनुष्ठान लाभल आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली संत ज्ञानेश्वर. संत एकनाथ. संत गोरा कुंभार. संत सोपानदेव यांच्या सोबतच अनेक संतानी आपल्या अंभगातुन निरुपणातुन समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केले. पहाटे काकड आरती त्यानंतर ज्ञानेश्वरी. किंवा ग्रथाचे सामुदायिक पारायण दुपारी ॢप्रवचण होते संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरि जागरण किर्तन केले जाते असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम असतो महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून पंरपरा सुरू आहे. महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो.
मात्र बेलगाव मध्ये 9 वर्षे सतत भागवत सप्ताह सुरू आहे येथे दरवर्षी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा साजरा केला जातो आजुबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी आमंत्रण दिले जाते यावेळी आजुबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होतात सर्व वारकरी संप्रदायाचे नागरिक टाळकरी. माळकरी भाविक. भंजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात डेकोरेशन. असलेला मोठा मंडप साउंड सिस्टीम भव्य व्यासपीठ गावागावांत मोठ मोठे बॅनर कार्यक्रम पत्रिका नामवंत कीर्तनकार गायक. वादक तसेच गावात भव्य रांगोळी काढतात व मोठ्या प्रमाणात महिला मिरवणुकीत सहभागी होतात या ठिकाणी वारकरी व गावातील नागरिक व सेवाधारी तसेच गावातील नागरिक व महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात