धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी गणेश गावित तर साक्री तालुका सरचिटणीस पदी संदीप बाबा बच्छाव यांची निवड

 


साक्री प्रतिनिधी  संजय बच्छाव.

    व्हॉइस ऑफ पत्रकार मीडिया पत्रकार संघटनेची धुळे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून गणेश गावित यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली तर दहिवेल येथील संदीप बच्छाव (बाबा पत्रकार) यांचे साक्री तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचा कौटुंबिक मेळावा धुळे येथे नुकताच पार पडला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड साहेब ,धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष जी भामरे व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या उपस्थितीत कार्यकारणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

    यावेळी बोलताना डॉ. सुभाष जी भामरे म्हणाले की पत्रकारांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करून असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे धुळे जिल्ह्यातील सब कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.संदीप बच्छाव यांची सक्री तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर बच्चा परिवाराकडून व मित्रमंडळी करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना दहिवेल गावातून व परिसरातून ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र मंडळ यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.