ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश



प्रतिनिधी | आकाश साळुंके

  सटाणा दि.०१ :- तालुक्यातील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ताहाराबाद व मुंजवाड या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी) घवघवीत यश संपादन केले.

       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व  उच्य प्राथमिक इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२३ चा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेत  ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड या विद्यालयाचे एकूण ५ उत्तीर्ण झाले तर इयत्ता ८वीतील १विद्यार्थीनी उत्तीर्ण झाली तर ताहाराबाद येथील इयत्ता ५ वी चे १३ विध्यार्थी उत्तीर्ण तसेच इयत्ता ८ वी चे ३१  विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंजवाड येथील विद्यार्थांना मुख्याध्यापिका श्रीमती आर.एन. शिंदे, श्री प्रकाश मोरे ,श्रीम.पुनम वाघ,दीपिका खरे तसेच ताहाराबाद येथील विद्यार्थांना श्री संजय गर्दे ,सारिका अहिरे ,श्री तुषार साळवे तर इयत्ता ८ वीतील विद्यार्थांना माध्यमिक मुख्याध्यापक श्री हर्षल पाटील, श्री तीर्थराज खैरनार, नितिन महाजन, श्री शशिकांत सोनवणे आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ दौलतराव गांगुर्डे , संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भूषण गांगुर्डे , सरचिटणीस अंजली गांगुर्डे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  विकास मानकर , माध्यमिक मुख्याध्यापक हर्षल पाटील मुंजवाड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम आर. एन. शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.मागील १० वर्षांपासून आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेले आहेत. दोन्ही विद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ दौलतरावजी गांगुर्डे यांनी विद्यार्थांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक सरला पवार, जयश्री वणीस, संगीता वाणी,अरुणा सूर्यवंशी, मनीषा सोनवणे, प्रफुल्ल जाधव, चंद्रशेखर महाजन, रणवीर जिरे, राहुल जाधव , सुनील निकुंभ,महेंद्र मांडवडे, प्रियंका निकम,शितल बच्छाव, ललित खेडकर, सोनाली देवरे , मनीषा नंदन , वंदना मानकर, वाघ कविता ,तृप्ती साळवे,सविता पवार, सरला निकम, प्रियंका चव्हाण, योगिता भामरे, केतन महाजन,विपुल बच्छाव, मनीषा जाधव, आदी उपस्थित होते.