प्रतिनिधी - रमेश करंजे (तळा)
तळा भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महसूलीचे महत्त्वाचे कार्यलय असून अपुऱ्या कर्मचार्यांनामुले नागरिकांना एका करिता वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. ह्या कार्यालयात एकूण १३ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत त्यातून ३जण मेडिकल सुट्टी वर आहेत सद्या स्थितीत शिपाई, भूमापक आणि उपअधीक्षक तिघेच कार्यरत आहेत.या कार्यालयात महत्त्वाचे भूकरमापक,नगरभूमापक,प्रतिलिपी लिपीक, आवक- जावक लिपीक, दप्तर बंद, शिपाई अशी ७ पदे रिक्त आहेत त्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणात कामे खोळंबली असून नागरिकांना आपला वेळ खर्च करून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या बाबत जिल्हाधिकारी संचालक भूमिअभिलेख कोकण विभाग मुंबई व जिल्हाभूमिअभिलेख यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.