प्रतिनिधी साहिल खान
चुलत बहीणी च्या लग्णा निमित्त रजे वर आलेल्या सिमा सुरक्षा दलाचा जवान अज्ञात वाहणाच्या धडकेत जगीच ठार तर १ जन जख्मी झाल्याची घटणा ता . १७ ला रात्री ९ वाजे दरम्याण लोणार तालुक्यातील औरगांबाद राज्य महामार्गावर भानापुर जवळ घडली .
प्राप्त माहीती नुसार सुलतानपुर पासुन जवळच असलेल्या येसापुर येथीली भारतीय सैन्य दलाचे जवान विकास शालीकराम गायकवाड वय ३० वर्ष हे आपल्या चुलत बहीणीच्या लग्नासाठी रजेवर आपल्या गावी येसापुर येथे आले होते
दरम्याण ९ वाजे दरम्याण नागपूर - औरंगाबाद हायवेवरुण अंजनी खुर्द कडून आपला मित्र किशोर शंकर धांडे वय ३४ यांच्या सह दुचाकी क्रमांक MH २८ - २४५७ ने घर परतत असतांना भानापुर जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत सैनिक विकास गायकवाड जागीच ठार झाले तर त्यांचा मित्र किशोर धांडे गंभीर जख्मी असुन मेहकर येथील हाऊस्पिटल मध्ये उपचार घेत आहे .
मृतक जवान विकास ला १ मुलगा ,मुलगी , पत्नी आई वडील असा परिवार आहे विकास हा ९ वर्षापुर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता . मात्र आर्धावर च त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला सैनिक विकास हे आई वडीलास ऐकुल ते एक पुत्र असुन त्यांना दोन बहीणी असल्याची माहिती आहे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
या घटणे चा पुढील तपास मेहकर पोनि निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनात पो कॉ रामेश्वर कोरडे , पो कॉ राजेश जाधव करीत आहेत .