एच ए एल हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजचे शालेय राज्यस्तर व विभागस्तर स्पर्धेमध्ये घवघवीत यश


प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी 

ओझर ३ मे : ओझर (टाऊनशिप)शाळेतील १७ आणि १९ वर्षां आतील विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारात  सहभाग नोंदवत  कॅरम,  कबड्डी, व्हॉलीबॉल आणि कराटे या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदके प्राप्त केली. तसेच मैदानी क्रीडा स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी नोंदवली.पुणे, (बालेवाडी)येथे आयोजितशालेय राज्य मैदानी  स्पर्धेमध्ये ४x ४०० मिटर 

रिले मध्ये खेळाडूंनी चांगली धाव घेऊन रौप्य पदक मिळविले. यामध्ये सोहेल शेख, अनुप तोडकर, मोहन हिला ,मनोहर खोदल यांचा सहभाग होता.

 तसेच नुकत्याच १८ ते २० एप्रिल २०२३ दरम्यान अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेमध्ये नववीतील खेळाडू हार्दिक खोडके आणि बारावीतील आयुष विजय या दोन्ही खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावून नाशिक विभागाचे आणि शाळेचे नाव उज्वल केले. तसेच विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये अखिलेश देवरे आणि कॅरम स्पर्धेमध्ये ज्योती जाधव, तेजस्विनी बिराडे, आकांक्षा जाधव, प्रेमदास ब-हे  यांनी विभाग स्तरावर चांगला खेळ करून चमक दाखवली.  गौरी कर्पे हिने  नंदुरबार येथे आयोजित नाशिक  विभाग स्पर्धेत  बॉक्सिंग या खेळांमध्ये  दुसरा क्रमांक मिळविला. खेळाडूंच्या  या यशाबद्दल संस्थेचे सचिव  डॉ  मो.स. गोसावी, एच. आर.डायरेक्टर डॉ.दीप्ती  देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी शाळेचे ,अधीक्षक  डॉ. खंडेलवाल, प्राचार्य एस.बी. शिरसाट, उपप्राचार्य एस.इ. पगारे, उप मुख्याध्यापक आर्.एल. पगारे, पर्यवेक्षक 

शेवाळे  एस.एम.  निकम,  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना  क्रीडा शिक्षक  योगेश शिंदे ,संभाजी  मुंतोडे आणि  सुनील एकार यांचे मार्गदर्शन लाभले.


फोटो :