उदगीर (प्रतिनिधी)
एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचे इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २३ विद्यार्थी पात्र झाले आहेत.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षातील इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचे इ.५ वी चे १४ तर इ.८ वी चे ९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून प्रथम प्राप्ती गंगंबिडे, द्वितीय आर्या सुडे, तृतीय हर्ष मुस्कावाड तर इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम श्रेया चामले, द्वितीय प्रवीण कांबळे, मेहराम देशमुख, तृतीय अरोही मुसणे हिने क्रमांक पटकावला आहे.
या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक सचिन बनाळे, संगीता जाधव, महादेवी गुंगे, कृष्णा वासुदेव यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, चेतन पाटील नागराळकर, मुख्याध्यापिका सौ स्नेहा निगुडगे, विभाग प्रमुख गणेश हुडे, सर्वच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.