कांदा न कापता कांद्याने रडवले


प्रविण चौरे 

चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्याने ६५ हजार रुपये खर्च करून चार महिन्यांत कांदा पिकवला. तीन बिघ्यात १२५० कि कांदा निघाला. बाजार समितीतील आडत्याने कांदा एक रुपया ३२ पैसे दि १३ तारखेला खरेदी केला.त्यात हमाली, तोलाई, गाडीभाडे आदींचा ८६. रुपये ४५ पैसे खर्च लागला.हे पैसे वजा हाेता, शेतकऱ्याच्या वाट्याला  ८३७.५५ ₹ आले. त्यातही १५००  रुपयांचे ट्रॅक्टर भाडे गेले.बाजारात २० रुपये किलो दराने ग्राहकांना मिळणारा कांदा आडत्याने एक रुपये किलोने खरेदीने केल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचे समोर आले.चांदवड  तालुक्यातील दुगाव येथील बाळू नंदू सोनवणे यांच्या कुटुंबातील सहा जणांची गुजराण ३.५ एकर शेतीवर होते.

     त्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही.त्यात चांगले उत्पन्न मिळणार या आशेने सोनवणे कुटुंबीयांनी दीड एकर शेतात म्हणजे ६० गुंठे शेतात ६५ हजार रुपये खर्च करून कांदा लागवड केली.यात दिवसरात्र सर्वांनी मेहनत करून चार महिन्यांत कांदा पिकवला. सध्या बाजारात २० रुपये किलाे दराने कांदा विक्री हाेत आहेत. त्यामुळे बाजार समितीत चांगला दर मिळेल या अपेक्षेने बाळू सोनवणे यांनी १३ मे रोजी चांदवड येथील बाजार समितीमधील फलके ट्रेडर्स यांच्या दुकानात नेला.त्या वेळी कांद्याचा लिलाव अवघा एक रुपया ३२ पैसे किलाेने झाला. त्यामुळे शेतकऱ्याला सात क्विंटल कांद्याचे ८३७ रुपये मिळाले.

    शेतकऱ्यांना १७०० ते १८०० रु. हमीभाव द्यावा शेतकऱ्याने जगायचे कसे हाच प्रश्न आहे सात क्विंटल कांद्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून तो पिकवून विक्री केला.त्यास केवळ एक रुपया ३२ पैसे किलाे दर मिळाला. शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, ‌ याचे उत्तर शासनाने द्यावे. तसेच शेतकऱ्यांना १७०० ते १८०० रुपये हमीभाव द्यावा.  बाळू नंदू सोनवणे दुगाव चांदवड