तळा चंडीका नाका ते बाजारपेठ कडे येणाऱ्या रस्त्यावर मुलगी व फिर्यादी वैशाली वाघमारे रहाणार हनूमान नगर ता.तळा या काल ता.४ मे.रोजी खरेदीसाठी बाजारात पायी चालत येत असता डाॅ.आंबेडकर चौक तळा येथे बाजार पेठेतून काळ्या मोटार सायकल वरुन अज्ञात आरोपी व साथीदार यांनी फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची १२०,०००/-किमतीची सोन्याची गंथन हिसकावून इंदापूर रोड कडे निघून गेले.
अशी माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो निरीक्षक शिवराज खराडे करीत असून सदर गुन्हा रोजी.नं.५४/२०२३ भा.द.वि.क.३९३,३४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या घटने नंतर पोलिसांशी संपर्क साधला असता तळ्यातील ही पहिलीच घटना असून महीला वर्गानी सावध रहावे. लग्न,समारंभ, बाजार खरेदी, गर्दीचे ठिकाणी चोरीचे घटना घडत असतात.अनोळखी व्यक्ती पासून व त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे संशय वाटल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या घटनेने महीला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.आजच्या काळात सुरक्षीतेचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.