संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश



                            जिल्हास्तरीय मुख्यमंत्री समृद्धी चषक निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख

सोयगाव :- येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थिनी कुमारी प्रिती कृष्णा पाटील व कविता भगवान बाविस्कर यांनी जिल्हा स्तरीय मुख्यमंत्री समृद्धी चषक निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांनी माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र या विषयावर आपल्या निबंधाचे लिखाण केले होते. त्यांना 15 हजाराचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    त्यांच्या या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा रंगनाथनाना काळे, सचिव प्रकाशदादा काळे, प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ उल्हास पाटील, पदव्युत्तर समन्वयक डॉ रामेश्वर मगर, डॉ सुभाष पाटील, प्रा विनोद चव्हाण, प्रा भारती पाटील, प्रा स्वाती चव्हाण, प्रा रवींद्र जाधव, प्रा अनिल मानकर प्रा ए ए सय्यद, प्रा बुटूले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.