स्क्राप मर्चंट दुकानांची चौकशी करा विद्युत मोटारी व मोटारसायकली चोरीच्या प्रमाणात वाढ

 


  प्रतिनिधी .सचिन म्हस्के   

      सोन‌ईत तीन ते चार स्क्राप माल खरेदीचे दुकानें आहेत त्यातील काही दुकानात अशा वस्तु खरेदी केल्या जात नाहीत मात्र ठराविक दुकानांत अशा वस्तु खरेदी केल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे अशा खरेदी केलेल्या वस्तु तातडीने तोडल्या जात आहेत तसेच अशा गाड्या व विद्युत मोटारींची विल्हेवाट लावली जात आहे ठराविक केंद्र या साठी प्रसिद्ध आहेत या बाबद सदर दुकान मालकाशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही मोटारसायकली राहुरी येथील व्यापारी यांच्या कडून घेतो म्हणजे राहुरी येथील मोठा व्यापारी सुद्धा यात सहभागी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या भागातील अनेक ठिकाणच्या विद्युत मोटारी चोरीला गेलेल्या आहेत अद्याप त्याचा तपास लागलेला नाही गावांतील अनेक ठिकाणचे लोखंडी सामान चोरीला जात आहे.

     या बाबद किती तक्रारी पोलीस दप्तरी नोंद आहेत हा संशोधनाचा विषय आहे किरकोळ तक्रारी दाखल होतात मात्र बराशया तक्रारी दाखल होतच नाहीत किरकोळ सामान (भंगार)गोळा करणारे बरेचशे येथे आहेत बाहेर काही राहिले तर गायब होतात मात्र कोणतीही चौकशी न करतां या दुकान दाराकडून अशा वस्तु खरेदी केला जात आहे त्यामुळे दुचाकी व कॅनाल वरील विद्युत मोटारी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे मात्र या विषयांकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने या घटना कमी होण्या ऐवजी वाढत आहेत याची वरिष्ठ अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. कोट. सोन‌ईतील घोडेगाव रोड लगत असलेल्या एका मोठ्या स्काप दुकानांची चौकशी केल्यास अनेक मोटार सायकल व विद्युत मोटारीचा छडा लागु शकतो असे बोलले जात आहे दुकान जरी भगाराचे असले तरी या दुकानांची उलाढाल लाखोंच्या घरात आहे याची चौकशी होणे गरजेचे