प्रतिनिधी प्रांजल पाटील
बागेश्वर बाबा यांचा आज पासून अंबरनाथमध्ये, ७ ते 9 मे पर्यंत संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत हनुमान कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील भक्तांना दर्शन घेण्याची हि संधी चालून आली आहे. संपूर्ण अंबरनाथ हा तालुका कालपासूनच भगवामय झालेला आहे.
भक्तांचा खूप मोठा समुदाय येणार हे अपेक्षित असल्या कारणाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व त्या योग्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.