ता.प्र. आकाश साळुंके
सटाणा :- अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा माहे फेब्रुवारी 2023 मध्ये सुरळीत पार पडली व तिचा निकालही जाहीर करण्यात आला आहे परंतु शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल अजूनही सुरू करण्यात आले नाही तसेच शासनाने 80% पदभरतीला परवानगी दिली असल्याने शिक्षकाच्या सुमारे 67000 जागा रिक्त असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले यामुळे 55000 पदांची शिक्षक भरती जाहीर करावी व कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच गोरगरीब मुलांना शाळेत दर्जेदार शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी तुषार शेटे यांनी केली आहे.
2017 पासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर निवृत्त शिक्षक न नेमता त्या जागा पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात याव्यात या मागण्या व पाठपुराव्यासाठी विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांची खान्देश विभागातील अभियोग्यता धारक तुषार शेटे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले त्यावर तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे व यासाठी जो पाठपुरावा असेल तो केला जाईल व हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले
निवेदनावर खान्देश विभागातील चतुरसिंग सोळुंके, आकाश साळुंके, सुधीर पाटील , पंकज शिंदे , साहेबराव अहिरे व इतर अभियोग्यताधारक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.