अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कार्यकारिणी श्री. जयंत पाटील आणि श्री. नवनाथ ठाकूर यांना आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार 2023


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

    शनिवार दि.२९ एप्रिल २०२३ रोजी 'अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था' -अलिबाग आयोजित 'आगरी अस्मिता साहित्य संमेलन' या सोहळ्यामध्ये राज्यातील १० पुरस्कार्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कल्याणमधील सापाड गावातील सुप्रसिद्ध आगरी कवी,चारोळीकार श्री.जयंत कृष्णा पाटील यांना 'आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार-२०२३' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री जयंत पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कल्याण शहराचे अध्यक्ष आहेत 

    श्री.जयंत कृष्णा पाटील हे कल्याण मधील सापाड गांव येथे राहत असून आगरी बोलीतून त्यांनी भरपूर लिखाण केले आहे कोणत्याही विषयावर ते कविता लिहितात. समाजातील सर्व विषयावर त्यांनी खुप कवितांचे लिखाण केले आहे. ते शिग्रकवी म्हणुन प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचा कविता खुप व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या आगरी कवितांचा खुप बोलबाला आहे. पहिला आगरी अभंग, आगरी आरती लिहिण्याचा मानही त्यानाच जातो. 


    सोशल मीडियावर त्यांचे आगरी शब्दार्थ आणि अभंगवाणी आगरी बोलीभाषेतून वाचायला मिळते. यांच्या साहित्य विषयक उत्तुंग कामगिरीचा विचार करूनच यांना 'आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार' देण्यात आलेला आहे. श्री.नवनाथ ठाकुर यांनी आपल्या गंभीर आजावर मात करून साहित्य विश्वामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून विशेष योगदान दिलेले आहे.ते शब्दांच्या पलिकडले आहे. समाजप्रबोधनासोबत उत्सव आणि चरित्र यांना आपल्या लेखणीतून त्यांनी अधिक प्रकाशीत केले. सभोवतालच्या परिस्थितीचे आणि मानवी भावभावनांचे विविध पैलू साहित्यिक कृतीतून चित्रित करून श्री.नवनाथ ठाकुर हे सृजनशील कार्याचे खऱ्याअर्थाने वाहकच आहेत. साहित्यिक क्षेत्रात प्रमाण भाषेसोबत श्री.नवनाथ ठाकुर हे आपल्या आगरी बोली भाषेला विशिष्ट दर्जा देऊन एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री.नवनाथ ठाकुर यांच्या साहित्य विषयक उत्तुंग कामगिरीचा विचार करूनच यांना 'आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार' देण्यात आलेला आहे. श्री. नवनाथ ठाकूर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कल्याण डोंबिवली महानगर चे अध्यक्ष आहेत 

      विविध ठिकाणाहून तब्बल ७० कवींनी या संमेलनात सहभाग नोंदवला होता. सदर संमेलनाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.कैलास पिंगळे सरांनी केलेले होते. ठाणे, कल्याण ,भिवंडी ,उरण, पनवेल ,नवीमुंबई, पेन, अलिबाग अशा विविध ठिकाणाहून कवी,लेखक आलेले होते. संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ लेखक डॉ.अविनाश पाटील सर, संमेलनाध्यक्ष सुप्रसिध्द जेष्ठ लेखक श्री.म.वा.म्हात्रे सर,कार्याध्यक्षा जेष्ठ कवयित्री सौ.स्मिता वाजेकर स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक,पत्रकार श्री.कैलास पिंगळे सर यांची सर्वानुमते नियुक्त करण्यात आली होती.

        संमेलनासाठी विशेष मान्यवर म्हणून अग्रसेन मासिकाचे संपादक श्री.चंद्रकांत पाटील सर, सौ.संध्या दिवकर तसेचकवी,लेखक,गायक,अन्य मान्यवर उपस्थित होते.