स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उन्हाळी शिबिर 2023 वरवंडी तांडा नं. 2


प्रतिनिधी रावसाहेब पगार

1997 पासून आज पर्यंत ज्यांनी शिकवलेल्या जवळपास 200 विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असे संत ज्ञानेश्वर विद्यालय कन्नड येथील प्रचंड प्रतिभा संपन्न व मेहनती शिक्षक श्री. प्रकाश जिरेमाळी सर यांनी आज वरवंडी तांडा नं. 2 येथील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

गणित विषयातील अनेक  क्लिष्ट प्रश्न ट्रिक्स चा वापर करून कशा पद्धतीने सोडवावेत याविषयी त्यांनी अनेक क्लृप्त्या विद्यार्थ्यांना दिल्या. नवोदय निवड चाचणी कशा पद्धतीने होते याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली. अगदी सहज व सोप्या भाषेत जवळपास तीन तास त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत कठीण घटक सहज समजावून सांगितले.एका प्रतिभा संपन्न व नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणाऱ्या एका अवलिया व्यक्तिमत्त्वाला आज अनुभवता आले याचा मनस्वी आनंद आहे 

स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या घटकातील अनेक संबोध वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून श्री.झिरपे सर यांनी स्पष्ट केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. प्रत्येक वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद, घडून आलेल्या आंतरक्रिया यामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने शिकण्याचा आनंद घेतला. अनेक शाब्दिक उदाहरणे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून सोडून घेतले. त्यातील बारकावे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून दिले. एकंदरीत दुपारचे सेशनही अप्रतिम झाले.

आजच्या दोन्ही सत्रातील शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष भानुसे सर, शाळेचे शिक्षक श्री.आसराजी सोंडगे सर, श्री. भाऊसाहेब कोथिंबीरे सर, श्री. गजेंद्र बारी सर, श्री.भरत काळे सर यांनी नियोजन केले व मेहनत घेतली.