जि.प.केंद्रीय प्रा.शाळा कन्नड नं.1 येथे राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा


सतीश कोळी,खुलताबाद

कन्नड दि.06.05.23 येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नं.1 येथे कोल्हापूरच्या राजघराण्यातील अग्रणी राजा राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी समारोह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रीय मुख्याध्यापक सतीश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या समयी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर विस्तारित प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन सतीश कोळी यांनी केले.

कन्नड नं.1 व 3 या शाळेच्या कार्यक्रमात या समयी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मोनिका शेजवळ,सहशिक्षिका कल्पना सुर्यवंशी कन्नड नं. 3 चे मुख्याध्यापक नंदू शिंदे,अर्चना पाटील, सुवर्णा गायके,कन्नड नं. 1 चे सबा अन्सारी,नाजेरा अन्सारी, साजेदा शेख,कल्याण राऊत,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शाळेचा वार्षिक परिक्षेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला.विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तकाचे वाटप यावेळी करण्यात आले.पुण्यतिथीचे अवचित्य साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यं साठी वक्तृत्व स्पर्धा होऊन विजेत्यांना तसेच शाळेतील चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी तर आभार कल्पना सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.