दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान पुरस्कारांचे 19 मे रोजी होणार वितरण

कंधार ; प्रतिनिधी :-. मारोती जिनके

    कंधार ( दि. 3 मे ) कै.दुर्गादास पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने गेल्या चार वर्षापासून पत्रकारांचा सन्मान केल्या जातो. सन 2022 चे पत्रकारीता पुरस्कार जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आले.यामध्ये राज्यस्तरीय, मराठवाडा स्तरीय तसेच जिल्ह्यातील पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १९ मे रोजी सकाळी ११ वा . कंधार येथे संपन्न होणार आहे. या सोहळासाठी दैनिक सामनाचे संपादक तथा खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

      राज्यातील व नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह च्या संयुक्त विद्यमानाने गेल्या चार वर्षापासून पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले होते . या आवाहनाला पत्रकारांनी भरभरून प्रतिसाद देत प्रस्ताव पाठवले होते. प्रस्तावाची छाननी करून पुरस्कार १ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आले . 

   यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार स्टेट न्युज महाराष्ट्र tvचे संपादक विलास आठवले यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भूषण पत्रकारिता पुरस्कार लोकपत्रचे संपादक रवींद्र तहकीक यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते २०२२ च्या सामाजिक कार्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे योगदान असल्याने या वर्षीचा संत गाडगे बाबा सामाजिक पुरस्कार सयाजी शिंदे त्यांना जाहीर करण्यात आला. तसेच नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील एका पत्रकाराला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.

         हा पुरस्कार सोहळा कंधार येथील संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांना खासदार संजय राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत.तर या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.