नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-
हॅलो इथे चोरटी वाळु(रेती) वाहतूक सुरू आहे. तुम्ही लवकर या असे म्हणत पोलीस हेल्पलाईन नंबर 112 ला कॉल केला खरा मात्र तिथे पोलीस पोचल्यानंतर प्रत्यक्षात काहीच दिसले नाही. उलट तक्रारदार हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने पोलिस प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून तक्रार दारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
खरं तर आपत्कालीन मदत मिळविण्यासाठी 112 नंबर हा डायल करून पोलिसांची मदत मिळवणे हा या नंबरचा उद्देश आहे. मात्र अगदीच शुल्लक कारणासाठी सुविधा आहे. म्हणून 112 कॉल करायचा आणि पोलिसांना वेठीस धरायचे असा सर्रास उद्योग सुरू असल्याने व पोलिसांची विनाकारण धावपळ होत असल्याने अखेर नांदगाव पोलिसांनीच फिर्यादी बनुन तक्रारदार अमोल इंदरचंद शर्मा यांच्या वर गुन्हा दाखल केला.
याबाबत नांदगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 26 मे 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पोलीस हेल्पलाइन नंबर 112 या नंबरवर नांदगाव तालुक्यातील वेहळगांव येथील अमोल इंदरचंद शर्मा यांनी वेहळगाव शिवारात चोरटी वाळु (रेती) वाहतूक सुरू आहे. तुम्ही लवकर या असा कॉल केला.तातडीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोगीर पोलीस वाहन चालक शाम थेटे, ज्ञानदेव जगधने असे तिघेजण नांदगाव पोलीस ठाणे येथुन तात्काळ सरकारी वाहनाने वेहळगाव येथे पोहोचले. तक्रारदार अमोल इंदरचंद शर्मा या तक्रारदारास शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी कॉल केला.असता तक्रारदार सरकारी वाहनाजवळ मद्यधुंद अवस्थेत पोहचला. पोलिसांनी त्यास तुम्ही डायल 112 ला कॉल केला होता का? अशी विचारणा केली.तसेच कुठे चोरटी रेती (वाळू) वाहतूक सुरू आहे.याबाबत विचारणा केली. मात्र तक्रारदार अमोल इंदरचंद शर्मा यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. दरम्यान पोलिसांनी तक्रारीची परिसरात खात्री केली असता असा कोणताही प्रकार झाले नसल्याचे समजले. तक्रारदार याने दारुच्या नशेत डायल 112 ला केलेला कॉल हा दारूच्या नशेत केल्याचे समजल्याने खोटे कॉल करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीचा दुरुपयोग केला म्हणून त्याचे वर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला.पोलिस शिपाई परमेश्वर एखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.