कल्पदिप कलासेस चा बारावीचा निकाल 100 टक्के.


प्रविण चौरे 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन-२०२२-२३ मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला.दुपारी दोन वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.त्यात कल्पदिप कलासेस च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले.

कल्पदिप क्लासेस चा  विद्यार्थि जीत हजरा याने प्रथम क्रमांक पटकावला.  दुसरा क्रमांक रोशनी परबलकर हिने तर तृतीय क्रमांक अजिंक्य चांडोळे यांनी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे . या वर्षी  बारावीच्या परीक्षे साठी क्लास मधून एकूण ३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी सर्वच विद्यार्थी परीक्षा पास झाल्याने कल्पदिप क्लास ने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कलासेस चे संचालक मयूर जाधव , प्रितेश जाधव व संचालिका सौ आश्विनी जाधव यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व असेच यश भविष्यात संपादन करून अधिकाधिक प्रगती करून आपले व आपल्या आई वडिलांचे नाव उंच करावे. प्रितेश दिपक जाधव  संचालक कल्पदिप क्लासेस