मुकेश निरुणे उदगीर
उदगीर येथील पोस्ते यांचे चॅम्पियनस् अकॅडमीची दणदणीत सुरुवात संस्थेचे सचिव श्री सूरज पोस्ते सर यांच्या संकल्पनेतून उदगीर वासियांसाठी लातूरच्या धर्तीवर आपल्या उदगीर तालुक्यातील पालकांची इच्छा लक्ष्यात घेऊन त्यांच्या पाल्याचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न आता उदगीर मध्ये साकार होणार आहे. लातूर पॅटर्नच्या धर्तीवर भविष्याचा वेध घेत असताना हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इयत्ता सहावी ते दहावी या वर्गाचे आयआयटी, फाउंडेशन कोर्स चालवा हा पालकांचा आग्रह लक्षात घेता या कोर्सेसची सुरूवात करण्यात आली आहे . यासाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी रविवार दि: 9 एप्रिल 2023 रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात पालकांचा सहभाग उल्लेखनीय व लक्षवेधी होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य डॉ. मुबारक मुल्ला यांनी केले , शाळेचे प्राचार्य आदरणीय दिगांबर शेकापुरे सर यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. पालक विद्यार्थी व शिक्षक जर एकत्र आले तरच आपल्या पाल्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते . काळानुसार आपल्यात बदल करावा लागतो हे अगदी खरे आहे असे त्यांनी सांगितले. सदरील कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हैदराबाद, झांसी छत्तीसगड, बेंगलोर येथील अनुभवी विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आदरणीय श्री. टी. चिरंजीवी हे केंद्रप्रमुख म्हणून कार्य पाहतील. या प्रसंगी शाळेतील शिक्षक ,शिक्षिका, पालक व विद्यार्थी यांचा सहभाग होता.