ऑनलाइन औषध विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न व केमिस्ट संघटनेच्या सिन्नरच्या कार्यक्रमात सुदेश आहेर यांचा सत्कार


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

        (२६ एप्रिल सिन्नर) : ऑनलाइन औषधविक्रीमुळे व्यवसायाच्या समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होत समृद्धीसाठी मदत आहे. त्यावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे गर्भपाताची औषधे, नशा व गुंगी आणणारी औषधे तसेच डुप्लिकेट औषधांचा काळाबाजार होत आहे. ऑनलाइन औषधविक्री बंद व्हावी यासाठी देश व राज्यपातळीवरील केमिस्ट संघटना कटिबद्ध असल्याची माहिती राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य अतुल अहिरे यांनी केले.

       सिन्नर येथे आयोजित केमिस्ट संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुदेश आहेर, सेंट्रल झोनचे उपाध्यक्ष रवींद्र पवार, राजेंद्र धामणे, नाशिक शहराध्यक्ष दीपक जाधव, सचिव शरद धनवटे, खजिनदार नीलेश शिरोडे, सिन्नर केमिस्ट संघटनेचे सचिन वाळुंज, अमित दराडे, राजेंद्र नवले, सुदेश खुळे आदी उपस्थित होते.

    ‌   अतुल झळके यांनी प्रास्तविक केले. या वेळी सचिन गोराडे, राहुल बुरड, जयेश गाढवे, अभिषेक खर्डे, गणेश घुले, प्रकाश शेंडगे, राजेंद्र हांडोरे, संदीप जाधव, शरद पगार आदींसह केमिस्ट बांधव उपस्थित होते. 

 व्यवसायाच्या समृद्धीसाठी मदत 

          जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुदेश आहेर यांचा सत्कार करण्यात आला. औषधविक्री व्यवसाय समृद्ध करण्यासाठी राज्य केमिस्ट संघटना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन केमिस्ट संघटनेचे मध्य विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र पवार यांनी दिले. सुदेश आहेर, दीपक जाधव, नीलेश शिरोडे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव संदीप चतुर यांनी आभार मानले.झळके यांनी प्रास्तविक केले.