प्रतिनिधी पहूर
जामनेर व पहूर शेंदुर्णी मार्गावर व देवळी व गोगडी पवित्र नद्यांच्या संगमेवर बसलेलं श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने घेतलेल्या हरकत प्रकरणी धर्मदाय न्यायालयात सुनावणी झाली आहे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अस्तित्वात असताना एकच मंदिरावर ओम श्री संगमेश्वर महादेव व गुपित महादेव मंदिर असा नावाने फेर फार करून माजी जिल्हा परिषद सभापती बाबुराव केशव घोंगडे यांनी सहायक धर्मदायक आयुक्त कार्यालय ट्रस्ट स्थापना करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला या प्रस्तावर श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी रीतसर हरकत नोंदवली आहे याप्रकरणी सहायक धर्मदायक आयुक्त च्या(12)रोजी सुनावणी झाली यावेळी हरकत नोंदविणार शिवभक्त रंगनाथ महाराज उपस्थित होते श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट गेले (18 ) वर्षापूर्वी नोंदणी कृती झालेली आहे तथापी ट्रस्ट त्या अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी पहूर कसबे ग्रामपंचायत कडे ओम श्री संगमेश्वर महादेव मंदिर या नावाने नोंदणी कृती मंदिर असून श्री संगमेश्वर महादेव मंदिराच्या नमुना क्रमांक( 8 )मिळकत क्रमांक(2244) हाच उतारा प्रस्तुत प्रस्तावासाठी जोडण्यात आला असल्याने भाविकांसह प्रशासनाची दिशाभूल होत आहे