सूर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकपदी अकोला येथे झालेली जिल्हाबदली...उरी मायभूमीत अध्यापनाचे धडे देण्याचा आनंद...गावी जाण्याची झालेली पूर्ण तयारी...नियतीच्या मनात मात्र काहि वेगळेच...बदली होवूनहि शिरवली गुरववाडी शाळेवर कामगीरी...इथेच नियतीने आपला क्रुरपणा दाखविला....आणी शाळेतून घरी परतत असना झालेल्या अपघातात दुदैवी मृत्यू...बदली झालेली आसताहि त्याःना कामागीरीवर न काढाता सोडण्यात आले आसते तर आज कदाचित् ते आपल्यात असते, अशी मन हेलावणारी प्रतिक्रिया तालुकावासियांमधून उमठत आहे.
या केवळ ३७ वर्षीय दुदैवी शिक्षकाच नाव आहे स्वप्नील संजय भटकर. ते तालुक्यातील वडगाव बुद्रुक शाळेवर कार्यरत होते. त्यांची आपल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालूक्यात जिल्हाबदली झाली होती. बदली होवूनहि त्याःना न सोडता येथील शिक्षण विभागाने शिरवली शाळेवर कामगीरोवर काढले. नेहमी प्रमाणे ते आपल्या दुचाकीवरुन शाळेतून घरी परतत होते. यावेळी मुंबई गोवा महामार्गावरील अपेडेफाटा ये रस्ता ओलांडताना भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई वडिल एवढाच परिवार आहे. आपला एकूलता एक मुलगा बदली करुन आपल्या सोबत राहणार याचा आनंंद मात्र नियतीने हिरावून घेतला. स्वप्नील येण्याऐवजी आलेल्या त्याच्या अकाली मृत्यूच्या बातमीने त्याःच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.