खेडमध्ये जलजीवन मीशन बैठकीत शिंदे- ठाकरे गटात बाचाबाची, मा. आ. संजय कदमांचा काढतापय



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

     येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पार पडलेल्या सभेत ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांना व्यासपिठावर बसविल्याने शिंदे-ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी जोरदार बाचाबाची उडाली. अखेर संजय कदम यांनी सभेतून काढता पाय घेतल्याने वातावरण शांत झाले.

       शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे आपल्या सहकारी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पंचायात समिती येथे आले. त्यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्या बैठकीला एकही लोकप्रतिनि धी उपस्थित नाहि असे सांगणारे अधिकारी हे ठाकरे शिवसेनेतील माजी आमदार संजय कदम व त्यां च्या पदाधिकार्यांना व्यासपीठावर बसवून दुपारी  दोन वाजण्याच्या सुमारास बैठक घेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सचिन धाडवे आक्रमक झाले व बैठकीतील अधिकार्यांना जाब विचारू लागले. 

        यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी हस्तक्षेप केल्याने ठाकरे व शिंदी गटत शाब्दिक चकमक उडाली. हा गोंधळ हमरीतुमरीवर आला असतानाच संजय कदम अधिकार्यांना खडे’बोल सुनाउन बैठकीतून निघून गेले. मात्र त्यानंतर ठाकरे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा जमाव वाढल्याने खेड पंचायत समिती आवारात काही काळासाठी तणाव पसरला होता. 

        शासन करोडोंचा निधी खर्च करत ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावत असतानाच आणी तालुक्यात डोंगरमाथ्यांवर वसलेल्या गाव वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे पाण्याचे दुर्भिक्ष असतानाहि लोकप्रतिनिधी मात्र राजकारणच करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.