प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी
ओझर : पवित्र रमजान महीन्याच्या निमित्ताने अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ओझर शहर मुस्लिम आघाडीच्या वतिने जामा मजीद यथे इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.दुर्गेश तिवारी, अ.आ.नि.स. चे मा.रविंद्रदादा जाधव, ओझर मंडल निरीक्षक मा. कुलकर्णी भाऊसाहेब, पोलीस उपनिरीक्षक मा.बालकदास बैरागी, पोलीस उपनिरीक्षक गणपतराव जाधव, गोपनीय पो.हवा.जितेंद्र बागुल, पो.हवा.नागेश गायकवाड, पो.हवा. कारंडे, समितीचे वसंतराव वाघ, प्रदीप पगारे, अजय शेजुळ, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक शहराध्यक्ष असलम ईब्राहीम शेख यांनी केले तर या कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शरीफभाई खाटीक, जिल्हा संघटक शब्बीरभाई खाटीक, आसिफ शेख सुभेदार, आसिफ खाटीक सर, खलीलभाई पटेल, रौफजी पटेल आदींनी परिश्रम घेतले. या इप्तार पार्टीत शेकडो हिंदु मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या वेळी सर्व हिंदु मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक तिवारी साहेब यांनी शुभेच्छा दील्या.