शिरसाळा हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 


    बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध व नवसाला पावणाऱ्या शिरसाळा  हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान जयंती निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शन घेतले.  मंदिर परिसर व मंदिरावर  रोषणाई करून मंदिर सजविण्यात आले आहे. भाविकांसाठी मंदिर परिसरात ७५ मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती. पन्नास हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मंदिरामार्फत करण्यात आली. 

हनुमान जन्मोत्सव निमित्त सकाळी पाच वाजता शिरसाळा हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते  महाअभिषेक करण्यात आला.सकाळी सहा वाजता  हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन प्रसादाचा भोग लावून इतर भाविकांसाठी प्रसाद वितरित करण्यात आला. महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर सुंदर कांड व हनुमान चालिसाचे पाठ केले गेले.मंदिरा तर्फे दिवसभर रक्तदान शिबिर घेण्यात आले. भाविक दर्शनासाठी येणार आहेत. सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे व पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.१९९३ मध्ये भसावळ येथील प्रसिद्ध उद्योजक बी.एन.अग्रवाल यांनी मंदिर बाधकाम सुरू मारोती डोक्यावर कळस,छत्री वा पत्रे टाकण्याचा प्रयत्न केला  पण मारोती यांनी छप्पर ठेवू दिले नाही.