नगर प्रशासनाला शहरवासियांच्या आरोग्याशी खेळू देणार नाहि- सतीश चिकणे



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

      सुस्त नगरप्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे आज शहरवासियांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. हि बाब संतापजनक असून शहरवासियांच आरोग्य धोक्यात आले आहे. यापुढे नगर प्रशासनाला शहरवासियांच्या आरोग्याशी खेळू देणार नसल्याचा गर्भीत ईशारा माजी नगरसेवक सतीश चिकणे यांनी दिला.

    गेले काहि महिने शहरात दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या पाश्वभूमिवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. ते म्हणाले, शहरात स्वच्छतेचा तीनतेरा वाजले असून सार्वजनिक  शौचालयांची अवस्था दयनिय बनली आहे. जी नव्याने उभारण्यात आली आहेत त्यांना कूलूप आहेत. कचरा प्रश्न तर वर्षेनुवर्ष गंभीरत होत चालला आहे. मग येणारा निधी जातो कोठे असा सवाल करत याबाबत आपण प्रशासनाला जाब विचारणार असून शहरवासियांच्या आरोग्यासाठी वेळ पडल्यास वरिष्टपातळीवर धाव  घेणार असल्याचे श्री. चिकणे म्हणाले.