साखरखेर्डा वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार



    साखरखेर्डा या गावची लोकसंख्या 25000 असून या गावात सतत अर्ध्या एका तासानंतर लाईट जाते... कुठलीही पूर्वसूचना न देता दोन दोन तीन तास लाईट बंद केल्या जाते  साखरखेर्डा सब स्टेशन अंतर्गत सात आठ खेडी  जोडलेली आहे या गावात छोटासाही प्रॉब्लेम झाला तर पूर्ण साखरखेडासह परिसरातील लाईट बंद केली जाते.. याचा साखरखेर्डातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.. 

    साखरखेर्डा येथील अभियंता कार्यालयात कधीच हजर नसतात ते चिखली वरून अप डाऊन करतात..  कित्येक दिवसाची मागणी आहे साखरखेर्डा सब स्टेशनला सेपरेट करण्यात यावे.. ग्राहकांच्या दैनंदिन तक्रारी वाढत असून याची कुठल्याच प्रकारची दखल हे वीज वितरण कंपनीचे अभियंता घेत नाही. त्याचप्रमाणे साखरखेर्डा परिसरातील कुठलेच लोकप्रतिनिधी सुद्धा या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.