मलकापुर प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी. दरवर्षीप्रमाणे यदांही वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात धरणगाव साजरी केली गेली दरवर्षीच्या नियोजन प्रमाणे सकाळी आठ वाजे दरम्यान करुणा बुद्ध विहार येथे सर्व बौद्ध बांधव तसेच गावातील नागरिक एकत्र येवून सकाळी बुद्ध वंदना घेतली जाते. वंदना झाल्याद त्यानंतर बारा वाजे पासुन ते तीन वाजे पर्यंत भोजनदान केले जाते आणि संध्याकाळी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील तैलचित्राची करुणा बुद्ध विहार येथून मोठ्या उत्साहात मिरवणुकीला सुरुवात होते.
मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील चित्राला गावातील नागरिक पुष्पहार अर्पण करतात हि मिरवणूक गावातून मोठ्या थाटामाटात निघते नंतर धरणगाव ग्रामपंचायत येथे गावातील प्रथम नागरिक सरपंच यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील तैलचित्राला माल्या अर्पण करून ठीक दहा वाजता या मिरवणुकीची समाप्ती करुणा बुद्ध विहार येथे होते हि मिरणूक रमेश झनके ग्रा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नरहरी झनके याच्या अशोक झनके सुनिल झनके विजय वानखेडे राजू मोरे पिंटू झनके जितेंद्र झनके. अंबादास झनके सुनिल मोरे अमित झनके विजय झनके गौतम झनके सुशिल झनके सचिन ईगंळे यांच्या सह समस्त बौद्ध बांधव व महिला उपस्थित होतात