पुतळा हलवाल तर शिवा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा



 लातूर/प्रतिनिधी

कव्हा नाका लातूर येथील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हठऊ नये, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर शहरातील कव्हा नाका परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर चौकातील राष्ट्रीय महामार्ग 361वरील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आणि राजीव गांधी चौकातील माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा पुतळा हटवण्याचा किंवा इतरत्र बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे सदरील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व स्वर्गीय राजीव गांधी यांचा पुतळा हटवू नये किंवा इतर ठिकाणी बसवण्यात येऊ नये या मागणीसाठी आज सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ खंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे

 कव्हा नाका येथील बसवेश्वर चौकातील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा 1990/91 साली बसविताना मोठे राजकारण झाले होते, व लोकसभागातून हा पुतळा बसवण्यात आला होता आज रोजी त्या भागात वीरशैव-लिंगायत समाज मोठ्या संख्येने राहतो आणि जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांचा पुतळा धार्मिक अस्थेचे स्थान आहे त्यामुळे हा पुतळा तेथून हाठऊ नये किंवा इतर ठिकाणी बसविण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे आज शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

 या निवेदनावर शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ खंकरे सुभाष आप्पा मुक्ता,नागनाथ बिरादार बामणीकर, कीर्तनकार लखादिवे गुरुजी,युवराज बिरादार देवणीकर, दिलीप अण्णा कत्ते औराद शहाजीनीकर निलंगा, महादेव आप्पा लामतुरे, कावेरी ताई विभुते, संतोष आप्पा वळसणे,रामेश्वर कदम सर, कीर्तनकार धनराज बुलबुले सर अशोक   नाईकवाडे, गणेश कारभारी, गणेश मुळे, गणेश हेरकर लातूर शहर शिवा संघटना, मुकेश उटगे, आकाश कानडे, आधीसह अनेकाच्या या निवेदनावर   स्वाक्षऱ्या आहेत.