भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जि प सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा बोरटेंभे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेचे पुष्पमाला व दीप धूप द्वारे पूजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी माहिती सांगितली. श्री माणिक भालेराव सर यांनी प्रास्ताविकाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थित सर्वांना विशद केली. श्री दशरथ सोनवणे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. त्रिशरण मित्रमंडळाचे श्री गौतम भडांगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवराय हे महापुरुष प्रत्येक घरात असणे आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर पाटील सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कसे होते, त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी कोणती प्रेरणा घ्यावी याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माणिक भालेराव सर यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार श्री ज्ञानेश्वर घोडे सर यांनी मानले.
याप्रसंगी त्रिशरण मित्रमंडळ बोरटेंभे यांचेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा म्हणून शाळेतील सर्वच (250) विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे मोफत लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू आडोळे, उपाध्यक्ष गुरुनाथ आतकरी, माजी उपाध्यक्ष देविदास आडोळे, गावचे पोलीसपाटील भगवान आडोळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील, अंकुश आडोळे, त्रिशरण मित्र मंडळाचे अतिषभाऊ भडांगे, दिलीपभाऊ भडांगे, संदीपभाऊ भडांगे, उत्तमभाऊ भडांगे, बबनभाऊ भडांगे, गौतमभाऊ भडांगे, आकाशभाऊ भडांगे, सुनीताताई भडांगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद पाटील सर, कडवे सर, घोडे सर, भारंबे मॅडम, भालेराव सर, बुवा मॅडम, महाजन मॅडम, सोनवणे सर त्याचबरोबर गावातील अनेक प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्रिशरण मित्रमंडळातर्फे उपस्थित सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली