हिवरखेड प्रतिनिधी
वान धरणाचे पाणी पळविण्याच्या निषेधार्थ लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल दादा गावंडे यांचे अनेक दिवसांपासून वारी धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून आज दिनांक 25 एप्रिल रोजी संपूर्ण तेल्हारा तालुक्यासह हिवरखेड शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला समस्त व्यापारी संघटनेने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवित हिवरखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.
शासनाने अकोला अमृत योजना तसेच बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठा योजनेचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सदर आंदोलन सुरू असून याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल.. आंदोलन तात्पुरते स्थगित
वारी भैरवगड येथे सुरू असलेल्या आंदोलनाची मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्यक्ष दखल घेतली असून त्या बाबत त्यांच्या कार्यालयात मे महिन्यात बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला आदेशित केले आहे व तसे पत्र प्रशासकीय अधिकारी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी आंदोलन स्थळी येऊन मा. अनिल भाऊ गावंडे यांच्या सुपूर्द केले त्यामुळे तुर्तास आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले