भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन


    संगमनेर : येथील सकल बहुभाषिक ब्राह्मण प्रतिष्ठान आयोजित भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त मंत्रजागर तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन श्री भगवान  परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.   या भव्य शोभायात्रेला दुपारी ४:३० वाजता प्रारंभ होणार असून सदर मिरवणूक ज्ञानेश्वर मंदिर, चंद्रशेखर चौक संगमनेर प्रांगणातून  निघणार आहे. शोभायात्रेचा मार्ग ज्ञानेश्वर मंदिर- नेहरू चौक -सय्यदबाबा चौक- मेन रोड - चावडी - अशोक चौक येथे भंडारी मंगल कार्यालय या ठिकाणी पोहोचेल.

    यानंतर सायंकाळी ७:३० वाजता भगवान परशुरामांचे पूजन व महाप्रसाद  असा कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. शोभायात्रेत सहभागी होत असलेल्या भाविक पुरुषांनी शक्यतो पांढऱ्या रंगाचा झब्बा,  महिलांनी केसरी रंगाची साडी परिधान करुन मिरवणूकीत सहभागी व्हावे. तसेच लहान मुलांनी शक्य असल्यास पारंपारिक महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी व्हावे  त्याचबरोबर शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजता पादुकापूजन व रुद्राभिषेक होणार असून सायंकाळी ६:०० वा.ज्ञानेश्वर मंदीर येथे मंत्रजागरण आयोजित केले आहे . या कार्यक्रमासाठी संगमनेरातील  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन श्री.वैभव उपासनी, श्री.अनिरुद्ध उपासनी, श्री.उत्कर्ष जोशी, दर्शन जोशी,श्री.भाऊ जाखडी ,सौ.आरती कुलकर्णी यांनी केले आहे.