साडेतीन मुर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया व इस्लाम धर्मीयांचा महत्त्वाचा सण रमजान ईद व विरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती एका दिवशी असल्याकारणाने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे रमजान ईद, अक्षय तृतीया व महान क्रांतिकारक वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते सावळदबारा येथे हि सर्व लिंगायत वाणी समाजाच्या वतीने सरपंच सावळद बारा श्रीमती शिवगंगा शिव आप्पा चोपडे यांच्या घरासमोर भगवान बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून सर्व समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले व याच दिवशी मुस्लिम बांधवांनी ईद हा सण मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसांची वाट पाहत असतात या दिवशी प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतो