प्रतिनिधी -शेख अल्ताफ
लव्हाळा परिसरात 2-3 दिवसांपासून विज, वादळ वारा आणि अवकाळी पावसामुळे, कांदा, भुईमूग, उन्हाळी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाने अनेक झाडे व फांद्या तुटून पडल्या आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत सेवा प्रवाहीत झाली आहे.संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. कधी उष्णता तर कधी थंडी यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडत आहे.सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे पण वादळ वारा व पावसामुळे वर-वधु परिवारासह वर्हाडी मंडळीचीही धावपळ होत आहे.शेवटी निसर्ग आहे