विश्वनाथ विद्यालयाच्या चित्रा पराडकर सेवानिवृत्त


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

    तालुक्यातील लवेल येथील विश्वनाथ विद्यालयाच्या शिक्षिका चित्रा पराडकर आपल्या ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सृवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या.

      आपल्या अध्यापन काळात त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले असून त्यापैकी काहि त्यांच्याच विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून २०१७ रोजी सौ. पराडकर यांना गुणवंत शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या पूढील वाटचालीसाठी येथील गटशिक्षणाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक आदींनी शुभेच्छा दिल्या.