प्रतिनिधी रईस शेख
हिंदू - मुस्लिम समाजाच्या अक्षय तृतीया (आखाजी) व ईद येऊन ठेपली असतांना आमखेडा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार आपले दुकान बंद ठेऊन आहे. त्यामुळे गोर गरीब शिधापत्रिका धारक शासकीय शिध्यापासून वंचित आहेत. मनमानी करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येऊन त्यास पाठीशी घालणाऱ्या तालुका पुरवठा अधिकऱ्याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी सोयगावच्या तहसिलदारांकडे करण्यात आली.
एकीकडे शासन गरीब जनतेसाठी सणावाराला शिधापत्रिका आधारे स्वस्त धान्य दुकानातून गहू,, तांदूळ देत आहे. तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदार मात्र सणवाराला दुकान बंद ठेऊन शिधा वाटप करीत नाहीत. असाच प्रकार आमखेडा येथील स्वस्तदु कानदार करीत आहेत. त्यामुळे हिंदू -मुस्लिम जनतेच्या अक्षय तुर्तीया व ईदला शिधा वाटप करण्यात आलेला नाही.पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्यदुकानदार संगनमत करून गोर गरीब जनतेचे रेशन काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे जनतेचे हाल बेहाल होत आहे,पुरवठा अधिकारी नाना मोरे यांना विचारणा केली असता उडवा उडावीची उत्तरे देत आहेत.अश्या बेजबाबदार व भावनाशून्य पुरवठा अधिकारी व शासकीय स्वस्त धान्य दुकांदारावर तात्काळ कारवाइ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रामा एलिस यांनी तहसीलदार सोयगाव व जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर एकनाथ एलिस, नितीन सोनवणे, केशव दणके, गणपत जेठे,पदमे, नारायण वाणी, सुमनबाई जोहरे ,मीराबाई जाधव, सुबतराबाई वावरे, अनिताबाई गोसावी,सुनीता इंगळे, श्रावण महाले, रघुनाथ राऊत, शंकर वाघ, आदी शेकडो शिधापत्रिका धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोट : सोयगाव येथील भ्रष्ट पुरवठा अधिकारी मोरे यांच्या आशीर्वादाने स्वस्त धान्य दुकानदार शासकीय रेशनचा शिधा सर्रास काळाबाजारात विक्री करून मालामाल होत आहे, तर गोर गरीब जनता सणासुदीला शासनाच्या स्वस्त रेशनपासून वंचित राहत आहे. संबंधित शासकीय स्वस्त रेशन दुकानावर व पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
रामा एलिस
तालुका अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोट : -
आमखेडा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान विविध सेवा सहकारी सोसायटीने माऊली महिला बचत गटाकडे देण्यात आले होते. बचत गटाला दिलेले इ पॉश मशीन त्यांनी परत केलेले नसल्याने रेशन वाटप करण्यास अडचण येत आहे. आम्ही सोयगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
- नाना मोरे
तालुका पुरवठा अधिकारी सोयगाव
सोयगाव - आमखेडा येथील शासकीय स्वस्त धान्यदुकान सणासुदीला बंद असल्याने वंचित शिधापत्रिकाधारकांनी
मनसेच्या नेतृत्वात सोयगाव नायब गोरख सुरे तहसीलदार आशिष औटी यांना निवेदन दिले.