महावितरणाची स्वामी समर्थ नगर, मध्ये लापरवाही



 स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेल आडगाव शिवारातील, कॉलनी मध्ये अनेक ठिकाणी,,महावितरणाचे उघडे मिनिप्लेअर आहेत काहींना दरवाजे देखील नाहीत त्यापैकी एक मिनिप्लेअर दर्शी हाईट्स, दाभाडे किराणा, स्वामी समर्थ नगर येथे उघड्या अवस्थेत असलेली विद्युत पेटी जीवाला हानिकारक व अपघाती ठरवू शकते, अशा अनेक पेट्या आहेत म्हणून 15 दिवसाच्या आत  सर्व परिसरातील मिनिप्लेअर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी पंचवटी नाशिक प्रभाग 2 मनसे शाखा अध्यक्ष  आकाश निकम यांनी या आधीही वरिष्ठ विद्युत विभाग अधीक्षक यांना पत्रक देऊन केली होती, परंतु अद्याप अजून काही काम झालेले नाही, जर काही जीवित हानी झाली तर सर्वस्वी जवाबदारी त्यांची असेल, जसे बिल थकबाकी असली कि, पटकन विद्युत पुरवठा खंडित केला जातो,तसेच सामान्य जनमाणसाच्या जीवाची किंमत काहीच नाही का ??म्हणून लवकरात लवकर कामे करून नागरिकांना दिलासा द्यावा.