सक्री तालुक्यातील जि. धुळे वासखेडी शिवारात मंगळवारी दिनांक 18 रोजी दुपारी दोनच्या सुमारासरी दुर्घटना घडली. या घटनेत दोन महिला गंभीरित्या भाजल्या असून नंदुरबार येथील रुग्णालयातून उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सक्री तालुक्यातील निजामपूर गावांमध्ये वासखेडी शिवारात एका शेतामध्ये मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना आहे .या कारखान्यात दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण स्पोर्ट झाला .स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. तोपर्यंत कारखान्यात आगीने रुद्र रूप धारण केले होते. या कारखान्यांमध्ये शेजारील जैताणे गावातील व परिसरातील सहा महिला काम करीत होत्या
त्यातील चार महिलांचा आगीत होरपळून अक्षरशः कोळसा झाल्याने जागीच मृत्यू झाला. त्यातील दोन महिला गंभीरित्या भाजल्याने त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळतात साक्री च्या तहसीलदार अशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे ,निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, यांच्यासह अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. आजी वर नियंत्रण मिळविण्यासाठी साक्री अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.