उदगीर/प्रतिनिधी
उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ विनायक जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे, नँकचे समन्वयक डॉ. ए एम नवले, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य ,सामाजिक कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जयंती समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ शिंदे एस व्ही यांनी तर आभार डॉ सी जे देशमुख यांनी मानले.