किरण माने इंदापूर प्रतिनिधी
शेळगाव दि.२७-क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे.के.क्रीडा प्रबोधिनी आयोजित दहा दिवशीय व्यक्तिमत्व विकास व क्रीडा प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.सुसंस्कांर व माणूसपणाच्या जगण्यामध्ये व्यक्तीमत्व विकासाला विशेष महत्त्व असून खेळ व क्रीडा प्रशिक्षणाचे स्पर्धा परीक्षा व भविष्याच्या बांधणीसाठीचे फायदे सांगताना जे.के.क्रीडा प्रबोधिनी च्या या उपक्रमाचे कौतुक करताना पुढील काळात विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
या कार्यक्रमाचे अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,आशा वर्कर्स, वैद्यकीय डॉक्टर्स व मेडिकल व्यवसायीक यांचा जे.के.प्रबोधिनी यांचे वतिने हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.राष्ट्रीय खेळाडू शंतनू उचाळे यांचा विशेष गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जे.के क्रीडा प्रबोधिनी चे संचालक कैलास जाधव यांनी प्रबोधिनीच्या कार्याचा मागोवा घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व जलतरण तलाव निर्मिती च्या उद्घाटनाची घोषणा करून उपस्थित पालकांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रसंगी भागवत भुजबळ, रामभाऊ ठोंबरे, प्राचार्य बंडू पवार, क्रीडा अधिकारी महेश चावले, जि.प.सदस्य मोहन दुधाळ, कर्मयोगी चे संचालक अंबादास शिंगाडे, राहूल जाधव, भैरवनाथ वि.का.सो.चे व्हा.चेअरमन उमेश ननवरे,मुक्ताई वि.का.सो.चे चेअरमन शिवाजी शिंगाडे,दलित पॅंथरचे नेते रमेश भाई पारधे, मुख्याध्यापक उमेश सुपूते,ग्रा.सदस्य तानाजी ननवरे, प्रगतशील बागायतदार,रतन ननवरे, डॉ.चवरे, डॉ.सचिन ननवरे लक्ष्मण पवार, पोलिस पाटील उषा वाघमोडे,युवा नेते शुभम शिंगाडे, प्रशांत भुजबळ, मनोहर जाधव पालक, खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महेश खराडे, बबलूभैय्या निंबाळकर, विठ्ठल ननवरे,ह.भ.प.अनिल महाराज जाधव, प्राचार्य संदिप जाधव यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम मोहिते यांनी केले व आभार मोहन दुधाळ यांनी मानले.